विरार : दिवाळीची सुट्टी लागली कि, फटके,रांगोळ्या फराळ या बरोबरच इतिहास प्रेमींची पावले वळतात ती गड किल्ल्याकडे. वसई विरार मध्येही सद्या इतिहासाची साक्ष देत असलेल्या गड किल्ल्यांचे दर्शन वसईकरांना होत आहे. वसई विरार मध्ये ठिकठिकाणी गड ,किल्ले उभारण्यात आले आहेत . यात प्रतापगड, कोंडाणा,भुदरगड,पन्हाळा,राहगड खांदेरी अश्या किल्यांच्या समावेश असून हे किल्ले बघण्यासाठी गर्दी होत आहे.
शिवरायांचा आठवावा प्रताप आणि त्यांचा इतिहास . आजही राजाची दूरदृष्टी सगळ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. समुद्रावरून आपल्या राज्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून राजांनी जलदुर्ग बांधले त्याच प्रमाणे आपल्या पेक्षा शत्रू प्रबळ असल्याने डोंगर मठावर गड किल्ले उभारून शत्रू बरोबर गनिमी काव्याने लढून शत्रूला पराभूत करण्याचे काम महाराजांनी केले . त्यांचा इतिहास लोकांपुढे यावा यासाठी वसई , नालासोपारा आणि विरार मध्ये ठिकठिकाणी गड किल्ले उभारण्यात आले आहेत.
Crime News : "पोलीस आयुक्तांची ओळख आहे..." फटाके विक्रीचा परवाना देण्याच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक; नाशिकमध्ये दोघांना अटककुठे पन्हाळा,प्रतापगड,भुदरगड,खांदेरी,सिंहगड (कोंडाणा) यासह अनेक किल्ले उभारण्यात आले आहेत. या किल्ल्याची माहिती हि व्यवस्थित पण देण्याचे काम येथील स्वयंसेवक करत असल्याने आपण थेट त्या किल्ल्याची भ्रमंती करत असल्याचा भास होतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे किल्ले उभारताना प्लास्टिक किंवा थर्माकोलचा उपयोग न करता पर्यावरणाचे भान राखण्यात आले आहे. हे किल्ले उभारण्याचे पूर्वी येथील बालगोपाला बरोबर मोठ्यांनी त्या किल्ल्याला भेट देऊन त्याचे बारकावे बघून किल्ला उभारणीचा केलेला प्रयत्न चांगला झाल्याचे दिसत आहे.
शिवप्रेमी म्हणून दरवर्षी मी वसई विरार मध्ये उभारण्यात येणाऱ्या किल्ल्याने आवर्जून भेट देत असतो. किल्ले उभारताना त्यांनी केलेले प्रयत्न ,किल्ल्याची त्यांना असलेली संपूर्ण माहिती, त्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिवराया बद्दल त्यांना असलेली आस्था वाखाणण्या जोगी असल्याचे दिसून आले.
मंगेश मस्के , दुर्गप्रेमी