'लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहिल'
'भाऊबीज लवकरच मिळणार'
ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट.
विधानसभा निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे सत्ता महायुतीकडे आली. मात्र, आता या योजनेत काही बदल करण्यात येत आहे. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. तसेच आता ई केवायसी देखील बंधनाकारक करण्यात आलं आहे. ई केवायसी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपात्र महिलांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे. सध्या दिवाळी सुरू आहे. आज दिवाळी पाडवा. तर, उद्या भाऊबीज. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लवकरच बंद होईल, असं वारंवार विरोधी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ही योजना अविरत सुरू राहिल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 'परवापासून दिवाळीच्या पर्वाला सुरूवात झाली आहे. आज पाडवा आहे. पाडव्याच्या देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन संकल्प, नवीन पर्व सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा', असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.
डोक्यावर हेल्मेट नाही, हँडलवर हात न ठेवता तरुणीने सुसाट बाईक पळवली, धोकादायक स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल'बळीराजावर आलेले संकट दूर हो त्यांच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन ये', असंही एकनाथ शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजनेबाबतही एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे. 'लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार. लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार', असं एकनाथ शिंदे म्हणाले.
तिशीतच हाडं ठिसूळ? गुडघे, सांधे ठणतात? खा घरगुती ४ पदार्थ, तज्ज्ञ सांगतात..आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत लढवणार नाही, असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलं. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि प्रत्येक पक्ष लोकशाहीमध्ये आपापला निर्णय घेत असतो. त्यामुळे त्यांचा तो निर्णय असू शकतो. त्यामुळे मी एवढेच सांगेल विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील महायुतीच्या भगवा डोलाने फडकेल', असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.