अनेकांना मद्यपान म्हणजेच दारू पिण्याची सवय असते. काहीकाही महाभाग तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटीच दारूची बॉटल तोंडाला लावतात. दारूच्या आहारी गेल्यामुळे पुढे या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
अनेक लोकांना रिकाम्या पोटी मद्यपान करण्याची सवय असते. त्यामुळे पोटात कोणतेही अन्न नसताना दारू प्यायलाने नेमके काय होते?हे समजून घेणे गरजेचे आहे.
सामान्यपणे आपण काहीतरी खातो किंवा एखादा द्रव पदार्थ पितो तेव्हा ते अन्ननलिकेच्या माध्यमातून थेट पोटात जाते. त्यानंतर पोटातील आतड्यांमध्ये संबंधित अन्नावर प्रक्रिये केली जाते आणि शेवटी ते अन्न रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून रक्तात शोषून घेतले जाते.
पोटात अन्न नसताने मद्यपान केले तर तर ते थेट अन्ननलिकेच्या माध्यमातून पोटात जाते. पोटात अन्न नसल्याने त्या मद्यावर शरीर लवकर प्रक्रिया करायला लागते आणि पिलेले मद्य तुलनेने लवकर रक्तात शोषून घेतले जाते. म्हणूनच कोणतेही अन्न न खाता रिकाम्या पोटी मद्यपान केल्याने अनेकांना लवकर नशा येते.
लवकर नशा चढल्याने व्यक्तीला भोवळ येणे, चालण्यात अडचण निर्माण होणे, नीट बोलता न येणे अशी लक्षणं दिसू लागतात. उपाशीपोटी मद्यपान केले, की पुढच्या काही मिनिटांतच त्या मद्याची नशा चढते परिणामी उलटी आणि मळमळ होण्याचीही शक्यता असते.
म्हणूनच नेहमी उपाशीपोटी मद्यपान करणे हे शरीरासाठी चांगले नाही, असे म्हटले जाते. अनेकांना उपाशीपोटीच मद्यपान करण्याची सवय जडते. त्यानंतर अशा व्यक्तींना अनेक आजार होण्याची शक्यता निर्माण होतो. मद्यपान करणेच मुळात चुकीचे आहे. तरीदेखील मद्यपान करत असाल तर ते रिकाम्या पोटी करू नये, असा सल्ला दिला जातो.
(टीप- मद्यपान करणे आरोग्यास हानिकारक असते. फक्त माहिती देणे हाच या स्टोरीचा उद्देश आहे. ही स्टोरी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेली आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी, डॉक्टरांशी संपर्क साधा.)