Accident News : दिवाळीत अपघाताचा थरार! भरधाव वाहनाने चौघांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू
Saam TV October 23, 2025 10:45 AM
  • अकोल्यात सणासुदीच्या काळात भीषण अपघात

  • अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

  • आरोपी चालक घटनास्थळावरुन फरार

  • अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण

अक्षय गवळी, अकोला

ऐन सणासुदीच्या काळात अकोल्यात मोठी दुर्घटना घडली आहे. अकोला नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडा जवळ वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर एक जण किरकोळ जखमी आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्गावरील पैलपाडा गावाजवळ चायनीज व्यवसाय करणारे बोरगाव मंजू भीम नगर येथील धिरज सिरसाठ,अश्विनी सिरसाठ हे कारंजा तालुक्यातील खेर्डा या गावातून आपल्या व्यवसायाची काम आटपुन चारचाकी गाडीने जात असताना त्यांची गाडी अचानक कुरणखेड जवळ बंद पडली.

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत पावसाचा हाहाकार! विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा

गाडी बंद पडल्याचे समजताच त्यांनी बोरगाव मंजू येथीलच एका मालवाहतूक गाडीने गाडी टोचन करून घेऊन जात होते. या दोन्ही गाड्या कुरणखेड आणि पैलपाडा गावच्या मध्यात महामार्गावर थांबल्या. गाडीतून उतरून गाडीचे टायर पाहत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारही व्यक्तींना उडवले.

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

या दुर्घटनेत अश्विनी शिरसाट, धिरज सिरसाठ हे दोघे पती-पत्नी तर आरिफ खान हे जाग्यावर ठार झाले. तर अन्वर खान हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकातर्फे अपघातामधील गंभीर जखमी अन्वर खान यांना मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात गाडीचा चालक अद्याप फरार आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. पोलिसांच्या सूचनेवरून अपघातात मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह आपत्कालीन बचाव पथकाच्या सदस्यांनी ॲम्बुलन्सच्या मदतीने उर्वरित तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.