अकोला : अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध सालासार मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. ही घटना रात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात दोन चोरट्यानी मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश करून दानपेटी उचलून नेत तिच्यातील सोन्या–चांदीचे दागिने काढून ती पेटी त्याच ठिकाणी फेकून दिली. पेटीत जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, एलसीबी पथक व शहर विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी तातडीने पोलीस पथकांना सूचना देत तपासाची दिशा निश्चित केली. पोलीस उपनिरीक्षक गुंजकर हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक युनिट दाखल होऊन पुरावे संकलित केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
Narayangaon Crime: 'सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या फ्लॅटमधून अकरा लाख रुपयांचा ऐवज चोरीला'; नारायणगाव, वारुळवाडी परिसरात चोरीचे सत्र थांबेनाया घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथक सुद्धा तपास करीत आहेत.