विरार (बातमीदार) : गेली ३५ वर्षे रसिकांसाठी यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे दिवाळी पहाट, दिवाळी संध्या यासारखे कार्यक्रम सातत्याने आयोजन करत आहेत. त्यानंतर वसई तालुका आणि पालघरमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ लागले. यंग स्टार्स ट्रस्ट आयोजित व ज्येष्ठ नागरिक संघ विरार, अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर दीपावली हा भरत म्हात्रे संचलित गाण्यांचा अतिशय सुंदर कार्यक्रम पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात रसिकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात मराठी व हिंदी भाषेतील विविध गाण्यांचे प्रकार सादर करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना अजीव पाटील यांची होती. शनिवारी (ता. २५) दिवाळी संध्या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.