DRDO Engineer Death : फक्त 5 मिनिटात खेळ आटोपला… जेवला, बायकोसोबत रुममध्ये गेला, त्यानंतर बाथरूममध्ये… ब्रह्मोस इंजीनिअरच्या बाबत असं काय घडलं?
Tv9 Marathi October 24, 2025 01:45 PM

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त घरी आलेला, DRDO मध्ये काम करणारा ब्रह्मोस मिसाइलचा सिस्टीम इंजिनिअर आकाशदीप गुप्ताचा मंगळवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. अवघ्या 30 वर्षांच्या आकाशदीपची तब्येत बिघडल्याने कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल, पण तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे सणाच्या दिवशीच गुप्ता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, आकाशदीप हा त्याच्या पत्नीसह लखनऊच्या आलबमाग येथील घरात रहायचा. तो गेल्या 7 वर्षांपासून ब्रह्मोस मिसाईल मिशनशी निगडीत होता. तो अति संवेदनशील मिशनवर काम करत होता, त्यामुळे त्याच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनांही हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे.

त्या रात्री काय घडलं ?

मृत आकाशदीपच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सणानिमितत्त तो घरी आला होता. मंगळवारी रात्री सर्वजण एकत्र जेवे, त्यानंतर आकाशदीप त्याच्या पत्नीसह त्याच्या खोलीत गेला. तिथून तो बाथरूममध्ये गेला पण अचानक धाडकन आवाज आला. जाऊन पाहिलं तर काय, आकाशदीप हा बाथरूममध्ये जमीनीवर खाली कोसळला होता. कुटुंबातील लोकांनी त्याला तसंच उचललं आणि उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. आकाशदीपला हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अटॅक आला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

मिमळालेल्या माहितीनुसार, आकाशदीपची पत्नी दिल्लीतील कॅनरा बँकेत काम करते. रात्री जेवणानंतर ही घटना घडल, तेव्हा कुटुंबियांनी त्याला लोकबंधू रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण उघड झाले नाही. त्याचा व्हिसेरा तपासणीसाठी जतन करण्यात आला होता. आकाशदीपची पत्नी भारती ही बँकेत काम करते. आकाशदीप हा दिवाळीच्या सुट्टीसाठी पत्नीसोबत लखनऊला आला होता. विशेष म्हणजे अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच,एप्रिलमध्ये त्या दोघांचंलग्न झालं होतं. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.