Satara Doctor Case : डाॅक्टर महिलेची आत्महत्या, यशोमती ठाकूर आक्रमक; म्हणाल्या, 'फडणवीसांकडे दोन पदं कशासाठी...'
Sarkarnama October 26, 2025 02:45 AM

Satara Doctor Case News : फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डाॅक्टरने आत्महत्या केली. तिने सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षकास आणखी एक जणावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश साताऱ्याच्या एसपींना दिले होते. त्यानंतर आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, महिला डाॅक्टरच्या आत्महत्येनंतर काँग्रेस नेत्या अॅड. यशोमती ठाकूर या प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.

त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दोन दोन पदं फडणवीसांनी स्वत:कडे ठेवली आहेत, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना दोन पदे झेपत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिला डाॅक्टरची आत्महत्या मनाला चटका लावणारी आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब जर जबाबदारी सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या. तुम्ही एकतर मुख्यमंत्री रहा, किंवा गृहमंत्री रहा, दोन्ही पदे तुम्हाला पाहिजेत, पण तुम्ही सांभाळू शकत नाही. महिला अत्याचाराच्या घटना राज्यात सातत्याने होत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष घाला आणि महाराष्ट्राचे रक्षण करा, अन्यथा राजीनामा द्या.’

Trimbakeshwar Railway Project : नवे संकट! एनएमआरडीए पाठोपाठ रेल्वेसाठी सर्वेक्षण, त्र्यंबकेश्वरचे शेतकरी हवालदिल तक्रारची दखल घेतली नाही

महिला डाॅक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावरच सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याने आपल्यावर अत्याचार केल्याचा तसेच घरमालक बनकर यांनी शारिरीक आणि मानसिक त्रास दिल्याचे नमुद केले आहे. महिला डाॅक्टरच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, ती रुग्णालयात कार्यरत असताना पोस्ट मॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी पोलिस तिच्यावर दबाव टाकत होते. तिने या छळा विषयी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देखील केली होती. परंतू पोलिसांनी त्याची दखल न घेतल्यामुळे अखरे पोलिसांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

Satara Doctor Case: 'ऐन भाऊबीजेदिवशी जीवन संपवलेल्या महिला डॉक्टरबाबत 'हा' धक्कादायक खुलासा; आतेभावाच्या आरोपांनी खळबळ
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.