राज्यात गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.
राज्यात उत्तर विदर्भ वगळता सर्वत्र पावसाची शक्यता आहे. येत्या ३ दिवसात राज्यात ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झाल्यानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविलेशनिवारी नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवार आणि सोमवारीसुद्धा पावसाची शक्यता असून मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात येत्या दोन दिवसात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी पुण्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे तापमानात मोठी घट झाली. येत्या दोन तीन दिवसात कमाल तापमान आणखी कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.