डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात खळबळजनक खुलासा, कुटुंबियांचा मोठा दावा, म्हणाले, तिने पोलिसांबद्दल…
Tv9 Marathi October 26, 2025 09:45 AM

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या महिला डॉक्टरने तळहातावर एक संदेश लिहून स्वत:चे आयुष्य संपवले. आपल्याला काय त्रास होत होता हे तिने हातावर लिहित थेट आरोपींची नावेही लिहिली. डॉक्टर संपदा हिच्या आई-वडिलांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून मुलीला शिकवले आणि डॉक्टर केले. एका पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे आरोप करत तिने तळहातावर बरेच गंभीर आरोप करत आयुष्याचा शेवट केला. डॉक्टर संपदा मुंडे हिच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. संरक्षण करणाऱ्या पोलिसांमुळेच तिला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. हेच नाही तर आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने 4 वेळा आपल्यावर बलात्कार केल्याचेही तिने म्हटले.

संपदा मुंडे यांनी यापूर्वी आरोपीबद्दल तक्रार दिली होती. मात्र, तिला पोलिस विभागाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. आता संपदा मुंडेच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप करत मोठी मागणी केली. आत्महत्या की, हत्या या अॅंगलने तपास करा. आठ दिवसांच्या आत एसआयटी स्थापन करून चाैकशी करा. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी म्हटले की, तिच्याकडून (संपदा मुंडे) आम्हाला सांगण्यात आले होते की, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी तिला पोलिसांकडून वारंवार त्रास दिला जात होता, तिने याबद्दल आम्हाला सांगितले होते.

आमचे अगदी स्पष्ट म्हणणे आहे की, फक्त एकाच अॅंगलने तपास न करता तिने अगोदर जीतक्रार दिली होती त्यानुसार आणि सहआरोपीसह आरोपीची चाैकशी करून कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. जे दोन आरोपी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात बोलताना म्हटले की, SIT ची स्थापना झाली पाहिजे आणि त्यानुसार चाैकशी व्हायला पाहिजे.

या SIT मध्ये काही महिला अधिकाऱ्यांचा समावेश असावा. जर आठ दिवसांमध्ये सरकारने या प्रकरणात SIT ची स्थापना केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले, संपदा मुंडेच्या आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.