Nanded Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध, हात-पाय बांधून नांदेडच्या तरुणाला बेदम मारहाण; अंगाला गरम चटके देऊन केला छळ
esakal October 26, 2025 09:45 AM

मुखेड (जि. नांदेड) : नांदेडच्या मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथून एक धक्कादायक घटना (Nanded Mukhed Love Affair Killed Case) उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून (Love Affair) २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचा विवाहित महिलेसोबत संबंध असल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

मृत तरुणाचे नाव विष्णूकांत पांचाळ (वय २१) असे असून तो गोणेगावचा रहिवासी होता. विष्णूकांत याचे कर्नाटकातील नागमप्पली (ता. औराद, जि. बिदर) येथील विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या नात्याचा राग मनात धरून महिलेच्या नातेवाईकांनी कट रचला.

Satara Doctor Case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; प्रशांत बनकरला घेतलं ताब्यात, आरोपींना फाशीची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी विष्णूकांतला नागमप्पली येथे बोलावण्यात आले. मात्र, प्रेमसंबंधाचा शेवट एका क्रूर हत्याकांडात झाला. आरोपी गजानन आणि अशोक यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी संगनमत करून विष्णूकांतचे हात-पाय बांधले आणि त्याच्यावर अमानुष अत्याचार केला. त्याला गरम चटके देऊन छळण्यात आले आणि बेदम मारहाण करण्यात आली.

या निर्दयी मारहाणीत विष्णूकांत गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच २२ ऑक्टोबरच्या सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या प्रकरणामुळे मुखेड आणि आसपासच्या भागात एकच खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.