अंबड: जालना जिल्हयातील अंबड शहरातील नाथरेकर चौकातील शंभर वर्ष जुनी असलेली दुमजली इमारत शनिवारी सकाळी अचानक कोसळली बाजूलाच किराणा दुकानाचे गोडाऊन आहे. यातील दोघे पायाला मार लागल्याने किरकोळ जखमी झाले. तर रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ऑटो रिक्षावर इमारतीचा ढिगारा पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाथरेकर चौकातील शेकडो वर्षापूर्वी बांधलेली दुमजली इमारत अत्यंत जीर्ण व मोडकळीस आली होती, हि इमारत सोडाणी यांच्या मालकीची आहे.
Prakash Londhe : खंडणीखोर माजी नगरसेवक प्रकाश लोंढेला मोठा दणका! नासर्डी नदीकाठच्या अतिक्रमित इमारतीवर महापालिकेचा बुलडोझरसोडाणी यांचे वास्तव्य सध्या छत्रपती संभाजीनगर येथे असल्याने या इमारतीमध्ये कोणी वास्तव्यास नव्हते. यामुळे होणारी दुर्घटना टळली आहे. खरतर शहरातील जुनाट व धोकादायक इमारतीला पालिका ने इमारत पाडण्यासाठी नोटिसा, सूचना काढणे आवश्यक आहे. जेणे करून जुनाट व धोकादायक इमारती वेळीच पाडल्यास पुढील होणारा धोका रोखण्यासाठी मदत होऊ शकते.
अंबड शहरात अनेक जुनाट व धोकादायक इमारती:अंबड शहरातील अनेक भागात गेल्या अनेक वर्षापासून बांधलेल्या जुनाट व धोकादायक इमारती आहेत. नगर पालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागातील मुदत संपलेल्या व जुनाट व धोकादायक इमारतींचा सर्व्हे करुण धोका टाळण्यासाठी वेळीच पुढाकार घेणे काळाची गरज बनली आहे.