Latest Marathi News Live Update : महिला डॉक्टर यांच्या कुटुंबीयांना खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन द्वारे संवा
esakal October 26, 2025 04:45 PM
Supriya Sule : महिला डॉक्टर यांच्या कुटुंबीयांना खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन द्वारे संवा

कुटुंबीयांकडून खासदार सुप्रिया सुळे यांना सांगण्यात आले की तपास करत असताना स्थानिक पोलीस हस्तक्षेप करत आहेत.

तपास एस आय टी कडे देण्यात यावा अशी मागणी कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसोबत फोन द्वारे संवाद साधत या प्रकरणांमध्ये जोपर्यंत हा तपास शेवटच्या आरोपी पर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत.

सर्वांना शिक्षा झाली पाहिजे असा विश्वास यावेळी दिला यावेळी कुटुंबीयांनी खासदार सुप्रिया सुळे यांना संपूर्ण व्यथा सांगितल्या.

Nashik Live : नाशिक मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगदा सोमवारपासून ९ महिन्यांसाठी राहणार बंद

नाशिक मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगदा सोमवारपासून ९ महिन्यांसाठी राहणार बंद

- जुन्या बोगद्याची लांबी वाढवण्यासोबतच ग्रेड सेपरेटर फ्लॉय ओव्हरच्या कामासाठी इंदिरानगर बोगदा राहणार बंद

- महामार्ग प्राधिकरणाकडून उद्यापासून सुरू करण्यात येणार काम

- इंदिरानगर बोगद्यातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन

Devendra Fadanvis : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर

Devendra Fadanvis : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण येथे कृतज्ञता मेळाव्यासाठी येत आहेत.

या मेळाव्या मध्ये फलटण मधील विविध विकास कामांचं ऑनलाईन भूमिपूजन सुद्धा होणार आहे.

या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित राहणार आहेत.

गेल्या दोन दिवसापासून फलटणमध्ये डॉक्टर महिला आत्महत्याचे प्रकरण गाजत असताना आज मुख्यमंत्री फलटणमध्ये येत असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Bhandara Live : भंडाऱ्याला पावसाने झोपडले

भंडाऱ्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

CM Devendra Fadnavis Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण दौऱ्यावर आहेत.येथे त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण केले जाणार आहे. 

Amravati News Updates : अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दानदान उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेलं शेकडो क्विंटल सोयाबीन भिजलं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळत आहे.

Pune Live News Updates : इंदापूर बस स्थानकात मध्यरात्री एसटीला आग

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर शहरातील बस स्थानकावर प्रवासी घेऊन आल्यानंतर उभे असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यावेळी प्रसंगावधान राखत प्रवासी बस मधून बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळाली यामुळे बसचे पूर्णपणे नुकसान झाले.

Beed News Live Updates : मंत्री पंकजा मुंडे महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या भेटीला

मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांची मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील तिच्या मूळ गावी जात भेट घेतली. माध्यमांशी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं मी आता संपुर्ण माहिती घेतली आहे. तिच्या जुन्या काही कंप्लेंट आहेत. तिच्यावर झालेल्या अन्यायमध्ये कोण आहे किंवा नेमकं काय घडलंय याबाबत चौकशी होणं गरजेचं आहे.

Pune News Live Updates : पर्यायी मार्गाचा वापर करा, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आवाहन

दिवाळीनंतर मुंबई - पुण्यात परतण्याची लगबग सुरू झालीय. यामुळे महामार्गावर कोंडीची शक्यता आहे. यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. दिवाळीत मूळ गावी गेलेले शहरवासीय पुणे मुंबईकडे परतण्यास सुरुवात झालीय. या प्रवाशांच्या मोटारी खाजगी बस यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस पुणे पोलीस तसेच पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक आणि वाहन चालकांना महामार्ग यांच्यापर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा अशा सूचना दिल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.