पुणे, ता. २५ : अखिल नवी पेठ कला-क्रीडा सांस्कृतिक महोत्सवातर्फे वसुबारसेनिमित्त गो-पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्ताने स्व. श्रीराम महादेव सपकाळ यांच्या स्मरणार्थ ५०० तुळशीची रोपे वाटण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गो-माता पूजन कार्यक्रमाची सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ‘गोहत्या बंदी’ कायद्याबाबत माहिती दिली. याप्रसंगी संयोजक पै. गणेश सपकाळ, रोहित खंडागळे, शेखर पवार, अजय राजवाडे, राकेश क्षीरसागर, नितीन सपकाळ, अनंत वनंगे, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.