सातारा जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. मृत महिला डॉक्टरने तिच्या हस्तलिखित सुसाईड नोटमध्ये प्रशांतचे नाव लिहिले होते. तर या घटनेतील आरोपी पीएसआय गोपाल बदने सध्या फरार आहे. पोलिसांची अनेक पथके त्याचा शोध घेत आहेत. डॉक्टरच्या आत्महत्येनंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. तर आता पीएसआय गोपाल बदनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्याचे शेवटचे लोकेशन सापडले आहे. यानंतर आता पोलीस तपास करत आहे.
सातारा येथील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे यांनी फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने जिल्हा आणि संपूर्ण राज्याच्या वैद्यकीय विभागाला हादरवून टाकले. आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने तिच्या हाताच्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिली.
Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलंत्यामध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गोपाल बदनेने तिच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. यातील बनकरला अटक केली आहे. तर फरार गोपाल बदने पंढरपुरात जाऊन लपला होता. त्याचे लोकेशन पंढरपूरमध्ये सापडले आहे. यानंतर पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागामध्ये वादात अडकली होत्या. या मुद्द्यांमुळे व्यथित होऊन डॉक्टरनेआत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. शुक्रवारी रात्री उशिरा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे या तरुण महिला डॉक्टरचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भावनिक परिस्थितीत तिचा मृतदेह फलटणहून वडवणी येथे आणण्यात आला. जिथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. या दुःखद मृत्यूमुळे व्यापक शोककळा पसरली आहे. जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपी प्रशांत बनकरला अटक केली आहे. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Satara Women Doctor Death : घरमालकाच्या मुलाला पुण्यातून अटक, PSI बदनेच्या लोकेशनबाबत मोठी माहिती समोरतिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये, तरुण डॉक्टरने प्रशांत बनकरवर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला आहे. प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर भाड्याने राहत असलेल्या पीजी रूमचा मालक असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणातील इतर आरोपी अजूनही फरार आहेत आणि पोलिसांच्या अनेक पथके त्यांचा शोध घेत आहेत.