रीलच्या नादात गमावला जीव, ट्रेनच्या धडकेत १८ वर्षांच्या दोन तरुणांचा मृत्यू; जळगाव हादरलं
esakal October 27, 2025 09:45 AM

रील बनवण्याच्या नादात जळगावमध्ये दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. रेल्वे रुळावर बसून रील बनवणं तरुणांच्या जीवावर बेतलं. जळगावच्या पाळधी गावात ही घटना घडलीय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल झाला होता. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रुळावर पडले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हर्षल नन्नवरे आणि प्रशांत खैरनार अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. दोघांचही वय फक्त १८ वर्षे इतकं होतं. पाळधी गावातल्या रेल्वे गेट जवळच्या भागात ते राहत होते. रीलच्या नादात त्यांनी जीव गमावल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धरणगावकडून अहमदाबाद–हावडा एक्स्प्रेस आली होती. या गाडीची धडक त्यांना बसली आणि दोघेही चिरडले गेले.

Satara : महिला डॉक्टर हॉटेलवर का गेली? मध्यरात्री दीड वाजता 'चेक इन', २ दिवसाचं बूकिंग; दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला

हर्षल आणि प्रशांत हे दोघेही रेल्वे गेटजवळ रुळावर बसून रील बनवत होते. कानात हेडफोन लावलेला असल्यानं अहमदाबाद एक्सप्रेस रुळावर आल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. भरधाव ट्रेनची धडक बसून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.