00774
आकेरी ः आकेरी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आकेरी सरपंच, उपसरपंचासह
कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कुडाळ, ता. २७ ः माणगाव जिल्हा परिषद गटात भाजपने ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का दिला. ठाकरे गटाचे आकेरी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसहित पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आकेरी सरपंच महेश जामदार, उपसरपंच गुरुनाथ पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घोगळे, मेघा गावडे, मैथिली पालव, प्राजक्ता मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मेस्त्री, बुथ प्रमुख अभय राणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जातो. या पक्षप्रवेशासाठी जिल्हाध्यक्ष सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संध्या तेर्से, बंड्या सावंत, राजू राऊळ, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाई सावंत, रुपेश कानडे, पप्या तवटे, मोहन सावंत, राजा धुरी, अजय आकेरकर, साधना माडये, श्वेता लंगवे, रामचंद्र परब, दीपक काणेकर, अजय डिचोलकर, सुनील बांदेकर, शशांक पिंगुळकर, तन्मय वालावलकर, अशोक कंदूरकर, सीताराम तेली, सोनू मेस्त्री, विजय वारंग, गुणाजी जाधव, संदेश वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.