सोने चांदी दर अद्यतन: सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता याच दरात मोठी घसरण होत असल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या (Gold price) आणि चांदीच्या (Silver Price) दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल म्हणजेच सोमवारी (२७ ऑक्टोबर) सोन्याचे दर जीएसटी (GST) शिवाय 1,22, 500 इतके असताना त्यात आज (28 ऑक्टोबर) 4, 300 रुपयांची घसरण होऊन तेf आणि दर 1,18, 200 रु. इतक्या खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात ही सहा हजार रुपयांची मोठी घसरण झाली असून 1, 51, 000 वरून चांदीचे दर 1,45, 000 रुपयावर घसरले आहेत.
बाजारपेठेतील तज्ञ सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीचे कारण अमेरिकन डॉलरची मजबूती आणि अमेरिका-चीन व्यापार कराराच्या बातम्यांना देतात. तथापि, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने अजूनही सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानले जाते. 24 कॅरेट सोने सामान्यतः गुंतवणूकीच्या उद्देशाने खरेदी केले जाते, तर 18 आणि 22 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी अधिक वापरले जाते.
16 ऑक्टोबर – 1 लाख 27 हजार 700
जीएसटीसह – 1 लाख 31 हजार 531
17 ऑक्टोबर – 1 लाख 31 हजार
जीएसटीसह – 1 लाख 34 हजार 930
18 ऑक्टोबर – 1 लाख 31 हजार
जीएसटीसह – 1 लाख 34 हजार 930
19 ऑक्टोबर – 1 लाख 28 हजार
जीएसटीसह – 1 लाख 31 हजार 840
20 ऑक्टोबर – 1 लाख 27 हजार 200 रुपये
जीएसटीसह – 1 लाख 31 हजार 16 रुपये
21 ऑक्टोबर – 1 लाख 30 हजार 500 रुपये
जीएसटीसह – 1 लाख 34 हजार 415 रुपये
22 ऑक्टोबर – 1 लाख 29 हजार रुपये
जीएसटीसह – 1 लाख 32 हजार 870 रुपये
23 ऑक्टोबर – 1 लाख 23 हजार रुपये
जीएसटीसह – 1 लाख 26 हजार 690 रुपये
जागतिक पातळीवर विचार केला असता रशिया आणि यूक्रेन आणि इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता वाढल्यानं त्याचा परिणाम झाला आहे. याशिवाय अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करार होण्याची शक्यता वाढल्यानं गुंतवणूकदारांची अस्वस्थता कमी झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी मलेशियात ASEAN संमेलनात म्हटलं की आम्ही चीन सोबत एक चांगला करार करत आहोत. ते या आठवड्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. यामुळं अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव कमी होताना दिसत आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा