पारनेर : कान्हूर पठार व पारनेर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी भाकप व किसान सभेच्या वतीने पारनेर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Ahilyanagar Accident: भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; सोनई-राहुरी रस्त्यावरील घटना, वडील व मुलीवर काळाचा घाला..तालुक्यातील कान्हूर पठार व पारनेर महसूल मंडळ अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. सरासरी पर्जन्यमान अधिक असताना प्रशासनाने या मंडळात कमी पाऊस झाल्याचा अहवाल दिला. त्यामुळे पारनेर व कान्हूर पठार महसूल मंडळे शासकीय निकषात न बसल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. या मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना देण्यात आले.
या प्रसंगी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष बबन सालके, गोकूळ काकडे, संजय भगत, सागर व्यवहारे, बापू गायकवाड, सरपंच संतोष कावरे, हरिभाऊ गायकवाड, नानाभाऊ खामकर, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.
Akole News: 'अकोले तालुक्यातील हातातोंडाशी आलेले भात पीक पावसाने हिरावले'; नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणीपारनेर व कान्हूर पठार या मंडळातील पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे या मंडळातील शेतकऱ्यांनाही विशेष बाब म्हणून नुकसान भरपाई मिळावी, असा विशेष बाब म्हणून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.
-गायत्री सौंदाणे, तहसीलदार