शैलेश सावंतची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड
esakal October 29, 2025 02:45 AM

swt2812.jpg
00963
शैलेश सावंत

शैलेश सावंतची पूर्व राष्ट्रीय
नेमबाजी स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ः पुणे, बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शैलेश सावंत याने २५ मीटर ०.२२ पिस्तूल प्रकारात (खुला गट) सहभाग घेतला होता. यात त्याने ३०० पैकी २४५ गुणांची नोंद करत ३४ वी ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.
ही स्पर्धा ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत अहमदाबाद (गुजरात) येथे होणार आहे. यापूर्वी शैलेशची १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात केरळ व भोपाळमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. तो उपरकर शूटिंग अकॅडमी सावंतवाडी येथे नेमबाजीचा सराव करत असून त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण व विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.