Pandharpur Kartiki Yatra: पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी ११५० जादा बस; वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज; उद्यापासून ६ नोव्हेंबरपर्यंत सेवा
esakal October 28, 2025 04:45 PM

सोलापूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या ११५० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सोलापूर विभागाच्या १५० गाड्यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळ सज्ज झाले आहे.

Solapur News: 'संपर्कप्रमुख कोकिळांवर धावून गेले शिवसैनिक'; साेलापुरातील शिवसेना (उबाठा) बैठकीत राडा, नेमकं काय घडलं..

कार्तिकी यात्रेतील महत्त्वाचा दिवस कार्तिकी एकादशी रविवारी (ता. २) आहे. तर पौर्णिमा बुधवारी (ता. ५) आहे. या कालावधीत पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. ३० ऑक्टोबरपासूनच येथे जनावरांचा मोठा बाजारही भरतो. यासाठी राज्यभरातील व्यापारी पंढरपूरला येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून कार्तिकी एकादशीसाठी भाविकांची मोठी रीघ लागते. या कालावधीत होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी एसटी प्रशासनाने सुमारे ११५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये सोलापूर विभागातील १५० जादा बस असून राज्याच्या विविध भागातून १००० जादा पंढरपूर येथे सोडण्यात येणार आहेत.

सोलापूर विभागाच्या १५० गाड्या

सोलापूर विभागाने या कालवधीत १५० जादा गाड्या सोडल्या आहेत. यामध्ये सोलापूर - बार्शी, पंढरपूर- मंगळवेढा, पंढरपूर -अक्कलकोट, पंढरपूर -शिखर शिंगणापूर या मार्गावर जादा बस सोडण्यात आल्या आहेत. तसेच पंढरपूर -पुणे, पंढरपूर -मुंबई व इतर अन्य महत्त्वाच्या मार्गांवर जादा बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विभागनिहाय जादा गाड्या

कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर विभाग - १००, पुणे विभाग - १००, सांगली विभाग -१००, सातारा विभाग -१००, सोलापूर विभागाच्या १५० अशा एकूण ५५० जादा बस पश्चिम महाराष्ट्रातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोलापूर विभागाच्या १५० बसमध्ये सोलापूर आगार २३, पंढरपूर आगार १५, बार्शी आगार ३०, अक्कलकोट आगार १३, करमाळा आगार १४, अकलूज आगार १०, सांगोला आगार १३, कुर्डुवाडी आगार १८, मंगळवेढा आगार १४ अशा एकूण १५० बस उपलब्ध करून देण्यात येणार आहोत.

Solapur Municipal Corporation: बिल्डरांच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करा; आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जनता दरबारात दाद

यात्रा कालावधीतील जादा गाड्यांना सर्व प्रवासी सवलती लागू राहणार आहेत. अमृत योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के भाड्यात सवलत, महिला सन्मान योजना ५० टक्के प्रवास भाड्यात सवलत आदी सर्व सवलती चालू राहतील. तरी सर्व वारकरी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करावा.

- अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, रापम

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.