टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिकेचा शेवट गोड केला. त्यानंतर आता टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्र आहेत. तसेच मिचेल मार्श याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. या मालिकेतील सलामीचा सामना कुठे आणि कधी होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला एकदिवसीय बुधवारी 29 ऑक्टोबरला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला एकदिवसीय सामना कॅनबेरातील मानुका ओव्हल येथे होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस केला जाईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवरुन लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवरुन पाहायला मिळेल.
शुबमनच्या नेतृत्वात भारताला एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात करता आली नाही. त्यामुळे आता सूर्याच्या नेतृत्वात भारताने कांगारुंचा धुव्वा उडवून विजयी सुरुवात करावी, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. सूर्याचा कर्णधार म्हणून हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे.त्यामुळे सूर्यासाठीही मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे सूर्या नेतृत्वासह बॅटिंगची जबाबदरी कशी पार पाडतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
तसेच या मालिकेत ओपनर अभिषेक शर्मा याच्याकडून फटकेबाजीची आशा क्रिकेट चाहत्यांना आहे. अभिषेकने गेल्या वर्षभरात ओपनर म्हणून स्फोटक फलंदाजी केली आहे. त्यामुळे अभिषेककडून आशा वाढल्या आहेत. तसेच भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे भारताची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांकडूनही धारदार बॉलिंगची अपेक्षा आहे.