CM Devendra Fadnavis: आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींसारखी पप्पूगिरी करू नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी
esakal October 29, 2025 10:45 PM

मुंबई : ‘‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तरी किमान ते महाराष्ट्राचा पप्पू आहेत, असे प्रदर्शन करू नये. मी त्यांना महाराष्ट्राचा पप्पू म्हणणार नाही. पण काँग्रेस नेते राहुल गांधी ज्या प्रकारे स्क्रीन लावून येरझाऱ्या घालत सादरीकरण करतात. तेच दुर्देवाने आदित्य ठाकरे यांनी केले. माझी एकच अपेक्षा आहे की आदित्यने राहुल गांधी बनू नये,’’ अशी जोरदार टोलेबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला शालजोडीत सुनावले.

तसेच आदित्य ठाकरे यांनी मतदार याद्यांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांचा समाचार घेत फडणवीस यांनी घेत निवडणूक आयोगाने यांना यापूर्वीच उत्तरे दिली आहेत. आयोगाने आव्हान देऊनही ते पुरावा देऊ शकले नसल्याचे त्यांनी सुनावले. आदित्य ठाकरे यांनी मतचोरीवरून सादरीकरण करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. ते मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Devgad Hapus: मुहूर्ताच्या हापूसने खाल्ला विक्रमी भाव, पहिल्या पेटीला २५ हजार; देवगड हापूसने पटकावला मान

ते म्हणाले, की ज्या प्रकारे राहुल गांधींनी सादरीकरण केले तसेच आदित्य ठाकरे करतायेत. ‘खोदा पहाड आणि चुहा भी नही निकला’ असे राहुल गांधी यांचे झाले आहे. तेच आदित्य ठाकरे यांनी केले. विरोधकांचा १ नोव्हेंबर रोजीचा मोर्चा म्हणजे ‘कव्हर फायरिंग’ आहे. निवडणुका जिंकू शकत नाहीत, त्यामुळे ही लोकं अगोदरच कारणे शोधत असल्याचेही फडणवीस म्हणाले.

खोटी कागदपत्रे दाखवायची सवय

आमदार रोहित पवार यांनी आधारकार्ड दाखवून काही आरोप केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की काहींना खोटी कागदपत्रे दाखविण्याची सवयच जडली आहे. त्यांनी दाखविलेले पॅनकार्ड खोटे ठरले आहे. आता ते पॅनकार्ड काढले कोणी यावर ‘एफआयआर’ दाखल होतो आहे, असे ते म्हणाले.

Mumbai News: मतचोरीविरोधात एल्गार! मनसेसह मविआचा मुंबईत सत्याचा मोर्चा निघणार
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.