01167
धावणे स्पर्धेत
समीक्षा वरक
जिल्ह्यात प्रथम
सावंतवाडी ः क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ओरोसतर्फे आयोजित जिल्हास्तरीय १५०० मीटर धावणे या प्रकारांमध्ये मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेची विद्यार्थिनी समीक्षा वरक हिने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिच्या या यशामुळे तिची पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल मळगाव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव आर. आर. राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले आदींनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.