‘या’ तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, महायुतीच्या नेत्याने फोडली तारीख
GH News November 01, 2025 10:11 PM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची चर्चा आहे. अनेक राजकीय पक्षांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. अनेक इच्छुक उमेदवार तयारी करत आहेत. न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अजून निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. अशातच आता महायुतीच्या एका दिग्गज नेत्याने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दिलीप वळसे पाटलांनी सांगितली तारीख

राज्यातील सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीत व्यस्त आहेत. अशातच आता माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकां निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहे. या तारखा जाही करताना त्यांनी कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख जाहीर करताना म्हटले की, ‘मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. पण आमच्याकडील माहितीनुसार 5 नोव्हेंबर ला नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक जाहीर होतील तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदान होईल.

पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील.’ मंचर येथे युवक-युवती मेळाव्यात बोलताना वळसे पाटलांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, वळसे पाटलांनी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यामळे आता राजकीय पक्षांच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरात तयारीला सुरुवात

कोल्हापूरातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका आणि राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलमध्ये तर राजकीय धुरळाच उडालेला पाहायला मिळत आहे. मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांकडून तसेच नेते मंडळीकडून बैठका, भेटीगाठी, तसेच आश्वासनांचा वर्षाव सुरू झाला आहे.

ही सगळी निवडणुकीची गडबड सुरू अज्ञातांनी शहरात लावलेले पोस्टर्स लक्षवेधी ठरत आहेत. ज्यावर काय पाहिजे सांगा, मी तुमचं काम करतो……पोराला नोकरी लावतो… सुनेची शाळेत ऑर्डर काढतो……. बँकेत कामाला लावतो… कारखान्यावर ऑर्डर काढतो… असा मजेशीर मजकूर लिहण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.