rat31p1.jpg-
01502
श्रीरंग जोगळेकर
-----------
स्वरवादन स्पर्धेत श्रीरंग जोगळेकर राज्यात प्रथम
राज्यस्तरीय कला उत्सव; अन्य स्पर्धांमध्ये पाचजणांचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : येथील युवा कलाकार, संवादिनीवादक श्रीरंग जोगळेकर याने कला उत्सवच्या एकल स्वरवादन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आयोजित कला उत्सव उपक्रमांतर्गत श्रीरंगने हे यश संपादन केले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी श्रीरंग आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
या आधी विविध १२ कलाप्रकारांपैकी सहा कलाप्रकारात रत्नागिरी जिल्ह्याने विभागस्तरावर अव्वल नंबर मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारात राज्यस्तरीय यश संपादन केले. यामध्ये श्रीरंग जोगळेकर (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, स्वरवाद्य वादन एकल) याने राज्यात प्रथम, स्वरा मोहिरे (रा. भा. शिर्के प्रशाला, शास्त्रीय नृत्य एकल) राज्यात द्वितीय, आकांक्षा सप्रे व कीर्ती देवस्थळी (दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी संगमेश्वर कथाकथन) राज्यात द्वितीय, सेजल साळवी व वेदा काळे (सर्वंकष विद्यामंदिर, दृश्यकला समूह) राज्यात तृतीय क्रमांक मिळवला.