Trending News: सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी पोट धरुन हसवतात, तर काही विचार करायला लावतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये एका Gen Z तरुणाने आपल्या बॉसला सुट्टीसाठी असं कारण दिलं की, बॉसला दया आली आणि त्याने थेट १० दिवसाची सुट्टी मंजूर केली. तरुणाने मेलमध्ये असं कारण सांगितलं की सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला.
सोशल मीडियावर एका मॅनेजरने एका ईमेल शेअर केलाय. या पोस्टनंतर सोशल मीडियावर तो ईमेलचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल झाला. या कर्मचाऱ्याने सर माझं ब्रेकअप झालं आहे, असं सांगून १० दिवसांची सुट्टी मागितली होती. Gen Z कर्मचाऱ्याची अवस्था आणि खरं बोलणं पाहून मॅनेजरने त्याची सुट्टी अप्रुव सुद्धा केली.
ईमेल मध्ये काय लिहलं होतं?KnotDating चे को फाऊंडर आणि सीईओ जसवीर सिंह यांनी एक पोस्ट शेअर केली. यावेळी त्यांनी एका ई-मेलचा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला. त्यामध्ये त्यांनी लिहलं की, 'मला सर्वात प्रामाणिकपणे लिहिलेला मेल मिळाला. त्यात लिहलं होतं की, हॅलो सर, माझं ब्रेकअप झालं आहे. त्यामुळे मी कामावर फोकस करु शकत नाहीय. मला थोडी विश्रांतीची गरज आहे. मी आज घरुन काम करतो. मला 28 ते 8 तारखेपर्यंत सुट्टी हवी आहे.'
कंपनीच्या सीईओनी या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं की, Gen Z कोणतेही फिल्टर न वापरता आपली कारणं मांडतात. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टला जवळपास 3.7 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.
अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करत आपली मतं माडली आहे. अनेकांनी कमेट्स करत म्हटलं की, 'मी देखील लग्नासाठी कधी इतकी मोठी सुट्टी घेतली नाही.' तर दुसऱ्या एका युजरने लिहलं की, 'हे खरं आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणी काम करु शकत नाही. ' दरम्यान सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
'तो जेव्हा सेटवर यायचा तेव्हा...' अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी सांगितला सलमानसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या...'तेरे नामच्या शुटवेळी...'