सोलापूर : सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित ३ हजार २९४ कोटींच्या खर्चास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच यातील राज्य सरकारच्या ५० टक्के हिश्श्यानुसार १६४७ कोटी रुपयांचा निधी देण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. यामुळे गेल्या पाच वर्षांपासून कागदावर असलेल्या या रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार आहे.
Solapur Politics:'साेलापुरात शिवसेना नसेल तर राष्ट्रवादी, माकपला सोबत घेऊ'; शिवसेनेच्या आघाडी न करण्यावर काँग्रेसची भूमिका..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध खात्यांशी संबंधित सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाच्या निधीला मान्यता देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे शक्तिपीठ रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर येणार आहे. यातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. राज्य शासनाने मंजूर केलेला प्रस्ताव आता केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल.
त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला अंतिम मंजुरी मिळणार आहे. प्रत्यक्षात गेल्या आठ महिन्यापूर्वी धाराशिव-तुळजापूर या ३० कि.मी. रेल्वे मार्गाच्या एक हजार कोटींच्या प्रकल्पाला मुहूर्त लागला. उर्वरित ५४ कि.मी. अंतराचा रेल्वे मार्ग, भूसंपादन, स्थानक उभारणी आदी कामांसाठीची एकत्रित निधीकरिता सोलापूर विभागाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला आज राज्य सरकारने मंजुरी दिली.
२०१९ मध्ये मंजुरी, प्रत्यक्ष काम २०२५ मध्ये सुरू
धाराशिव - तुळजापूर - सोलापूर रेल्वे मार्गाला २०१९ मध्ये मंजुरी मिळाली. ८४ किमी अंतराच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१९ मध्ये भूमिपूजन झाले. पूर्वी हा प्रकल्प १ हजार कोटींच्या घरात होते. त्यानंतर आता वाढीव प्रचलित दरानुसार हा प्रकल्प ३ हजार २९४ कोटींच्या घरात गेले. यात राज्य शासनाचा ५० टक्के तर केंद्र शासनाचा ५० टक्के हिस्सा असणार आहे. त्यानुसार राज्य शासनाने मंगळवारी या वाढीव निधीला मंजुरी दिली आहे.
Ujani Dam: 'उजनीतून यंदा शेतीसाठी तीनदा सुटणार पाणी'; जानेवारीअखेर पहिले आवर्तन; ‘कालवा सल्लागार’मध्ये होणार अंतिम नियोजन ही कामे होणारधाराशिव येथे १२ हजार चौरस मीटरचे रेल्वे स्थानक, जलदगती रेल्वेमार्गासह यासाठी आवश्यक असणारी पर्याय व्यवस्था, मालगाडीसाठी आवश्यकतेनुसार मोठ्या लांबीची लूपलाइन, ३१ रस्त्यांच्या खालून रेल्वे मार्गासाठी पूल तयार केले जाणार आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पूल, प्रवाशांसाठी अनेक महत्त्वपूर्ण सोयीसुविधा, पथमार्ग, दादरा, प्लॅटफॉर्म यासह रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी साधारणः ३५० निवासस्थाने आदी कामे या निधीमधून केली जाणार आहेत.