बॉलिवूडचा सिरीयल किसर अभिनेता इमरान हाश्मी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतोच. विशेषत: त्याच्या स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे अनेकदा तो वादग्रस्त वक्तव्य करतो आणि त्याला ट्रोलही केलं जातं. आता पुन्हा एकदा इमरानने असंच एका विषयाबाबत वक्तव्य केलं आहे ज्यामुळे कॉन्ट्रोवर्सी झाली आहे. अलिकडेच इमरान हाश्मीचा ‘ओजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. ‘ओजी’ नंतर इमरानचा ‘हक’ हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज आहे. हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. याच चित्रपटावरून केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
‘हक’ हा चित्रपट त्याच्या संवेदनशील कथानकामुळे बरीच चर्चा
इमरान हाश्मी-यामी गौतम स्टारर ‘हक’ हा चित्रपट त्याच्या संवेदनशील कथानकामुळे बरीच चर्चा करत आहे. हा चित्रपट शाह बानो तिहेरी तलाक प्रकरणावर आधारित आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून, हा चित्रपट एखाद्या विशिष्ट धर्माला दुखावण्यासाठी बनवला गेला आहे का याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इमरानने या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना म्हटले आहे की हा चित्रपट कोणालाही लक्ष्य करत नसल्याचं म्हटलं आहे.
इमरान हाश्मी मुस्लिम, त्याची पत्नी हिंदू मग त्याचा मुलगा कोणता धर्म पाळतो?
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, अनेकांनी त्याचे कौतुक केले, तर काहींनी त्यावर टीकाही केली. काहींनी म्हटले की या चित्रपटात मुस्लिमांना लक्ष्य केले आहे किंवा त्यांना नकारात्मक पद्धतीने चित्रित केले आहे. तथापि, एका मुलाखतीत इमरानने हा चित्रपट कोणत्याही समुदायावर भाष्य करत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच या मुलाखती दरम्यान इमरान हाश्मीने त्याच्या मुलाबद्दल खुलासा केला आहे. इमरान हाश्मी मुस्लिम आहे तर, त्याची पत्नी हिंदू आहे. अशावेळी त्याचा मुलगा नक्की कोणता धर्म मानतो याबद्दल त्याने स्पष्टच सांगितले आहे.
#WATCH | Mumbai | On his upcoming film ‘Haq’, actor Emraan Hashmi said, “…As a liberal Muslim, I have no problem with the viewpoint of this film because we’re not maligning any community… I married Parveen, who is a Hindu. My son offers ‘puja’ and ‘namaz’ both. I have a… pic.twitter.com/hVQWXCepbL
— ANI (@ANI)
चित्रपटाच्या विषयावरील वादावरही स्पष्टता दिली
इमरान हाश्मी स्वतःला एक उदारमतवादी मुस्लिम म्हणून वर्णन करतो. तो मुस्लिम कुटुंबातून येतो, तर त्याची पत्नी परवीन शहानी हिंदू आहे. इमरान हाश्मी त्याच्या मुलाबद्दल म्हणाला, “मी परवीनशी लग्न केले, जी हिंदू आहे. माझ्या कुटुंबात, माझा मुलगा देखील पूजा करतो आणि प्रार्थना करतो. हा माझा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आहे. म्हणून, मी या चित्रपटाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतो. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या संगोपन, धर्म आणि वातावरणावर आधारित चित्रपट पाहते.” असं म्हणत त्याने पुन्हा एकदा चित्रपटाच्या विषयाबद्दल झालेला गैरसमजही दूर केला तसेच त्याच्या घरात कोणत्या प्रकारचे वातावरण आहे हे देखील सांगितले.
इमरान हाश्मीच्या कुटुंबाबद्दल…
इमरान हाश्मीच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झालं तर, त्याची आई ख्रिश्चन होती, तर त्याचे वडील मुस्लिम कुटुंबातील होते. इमरान हाश्मीची पत्नी परवीन शहानी हिंदू आहे. इमरान हाश्मी आणि परवीनचे लग्न 18 वर्षांहून अधिक काळ झाले आहे. लग्नापूर्वी ते अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. इमरान हाश्मीची पत्नी आणि मुलगा दोघेही लाईमलाईटपासून दूरच असतात.