Crime News : एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. एक महिला हॉटेलमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत होती. पण हॉटेलवर पोलिसांचा छापा पडला आहे कळताच, बॉयफ्रेंड फरार झाला आणि अर्धनग्न अवस्थेत असलेल्या महिलेने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली…महिलेला तात्तकाळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तपासात पोलिसांना काही गोष्टी सापडल्या आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तर पोलीस देखील याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
मंगळवारी दुपारी आग्रामध्ये सिकंदरा पोलीस स्टेशन परिसरातील शास्त्रीपुरम येथील आरव्ही लोधी कॉम्प्लेक्समधील हॉटेल द हेवनच्या पहिल्या मजल्यावरून एक महिला पडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या मजल्यावरून महिलेने जेव्हा खाली उडी मारली, तेव्हा ती अर्धनग्न अवस्थेत होती. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. त्यानंतर नागरिकांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
पोलिसांनी जखमी मुलीलापश्चिमपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून, तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. तर घडलेल्या घटनेनंतर महिलेचा बॉयफ्रेंड आणि हॉटेल स्टाफ फरार आहेत. पोलीस सध्या त्यांच्या शोधात आहेत.
स्थानीक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली होती. दरम्यान, महिला खोलीतून गच्चीवर पळून गेली आणि एका अरुंद डक्टमध्ये लपण्याचा तिने प्रयत्न केला. डक्ट कमकुवत असल्याने तिचा तोल गेला आणि ती पडली. पण समोर येत असलेल्या माहितीनुसार, पोलीस हॉटेलवर छापा टाकण्यासाठी गेले नव्हते.
एसीपी अक्षय महादिक यांच्यानुसार, ‘महिला पहिल्या मजल्यावरून पडल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटना स्थळी गेलो… त्याठिकाणी कोणत्याच प्रकारची रेड सुरु नव्हती…. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरु आहे..’
पोलिसांना खोलीत काय सापडलं?हॉटेलची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी 4 नंबर खोलीतून ‘हॅप्पी बर्थडे’ लिलिहेले फुगे आणि सजावटीचं सामान मिळालं. खोली अस्ताव्यस्त अवस्थेत आढळली. असा संशय आहे की, ती महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिथे राहत होती आणि ते वाढदिवस साजरा करत होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये लोक वारंवार येतात आणि रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्या आणि इतर गोष्टींमुळे रहिवाशांना त्रास होत आहेत.
सीसीटीव्ही आणि हॉटेलच्या नोंदी तपासल्या जात आहेत…पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि रजिस्टर ताब्यात घेतलं आहे आणि तपास सुरू केला आहे. ते रूम बुक करण्यासाठी वापरलेलं नाव आणि ओळखपत्र शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.पोलिसांनी हॉटेल चालकाची चौकशी सुरू केली आहे आणि हॉटेलची कायदेशीरता देखील तपासली जात आहे.