तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या 2 संघांना प्रत्येकी 10 कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच विजयी संघाला कमाईची संधी आहे. विजेत्या संघाना चौपट कमाईची संधी आहे. (Photo Credit: PTI)
वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये वर्ल्ड कप विजेत्या, उपविजेत्या संघांना किती रक्कम मिळणार? याची उत्सूकता लागून आहे. आयसीसीने यंदा बक्षिस रक्कमेच घसघशीत वाढ केली आहे. वर्ल्ड कप विजेत्या संघाला गेल्या स्पर्धेच्या तुलनेत 9 कोटी जास्त मिळणार आहेत. गेल्या स्पर्धेत 31 कोटी रुपये देण्यात आले होते. तर यंदा 40 कोटी रुपये वर्ल्ड कप विजेत्या संघाला दिले जाणार आहेत. (Photo Credit: PTI)
उपांत्य फेरीतील विजयी संघाला 20 कोटी मिळणार आहेत. तर वर्ल्ड कप विजेत्या संघाला 40 कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे आता कोणता संघ 20 कोटी रुपये मिळवतो आणि कोणता संघ वर्ल्ड कप ट्रॉफीसह 40 कोटींचं बक्षिस पटकावतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit: PTI)
उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात गुरुवारी 30 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. मात्र बाद फेरीतील या सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. (Photo Credit: PTI)
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या 4 संघांनी धडक दिली आहे. उपांत्य फेरीतील पिगल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. हा सामना गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. (Photo Credit: PTI)