भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला सिडनीत झालेल्या वनडे सामन्यात गंभीर दुखापत झाली आहे.
त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, बीसीसीआय त्याच्या बहिणीला सिडनीला नेण्यासाठी विशेष व्यवस्था करणार आहे.
बीसीसीआयचे डॉक्टर सध्या त्याच्यासोबत आहेत.
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. नुकतीच वनडे मालिका संपली. पण शनिवारी या वनडे मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारताला मोठा धक्का बसला. भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली आहे.
सिडनीत झालेल्या तिसऱ्या वनडेदरम्यान, हर्षित राणाच्या गोलंदाजीवर ऍलेक्स कॅरीचा झेल घेताना तो त्याच्या बरगड्यांवर पडला. ज्यामुळे त्याला बरगड्यांना दुखापत झाली, तसेच त्याती प्लीहा फुटल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता.
त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला मंगळवारी ICU मधून बाहेर काढण्यात आले. सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्या उपचारांवर लक्ष ठेवून आहे.
Shreyas Iyer च्या जीवाला होता धोका, BCCI च्या मेडिकलने टीमने वेळीच पावलं उचलली नसती, तर...दरम्यान, मिडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय श्रेयसची बहीण श्रेष्ठा हिला सिडनीत घेऊन येण्यासाठी विशेष व्यवस्था करणार आहे, जेणेकरून ती सिडनीत त्याच्यासोबत राहू शकेल. सध्या अजून काही दिवसतरी श्रेयस हॉस्पिटलमध्येच उपचार घेणार आहे. त्याच्यासोबत बीसीसीआयचे डॉक्टर आणि त्याचे तेथील मित्र आहेत.
बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी माहिती दिली आहे की भारतीय संघाचा डॉक्टर रिझवान खान श्रेयससोबत सिडनीमध्ये थांबले आहेत. तसेच श्रेयसला सिडनीतील सर्वोत्तम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. तसेच त्याच्या उपचारांसाठी बीसीसीआय सर्वोत्तम प्रयत्न करत आहे.
दरम्यान, याआधीच अशी माहिती मिळाली होती की श्रेयसची दुखापत गंभीर होऊ शकली असती, मात्र बीसीसीआयच्या मेडिकल टीमने तातडीने घेतलेल्या निर्णयांमुळे आणि उपचारांमुळे त्याचा जीव वाचला आहे.
तसेच भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही स्पष्ट केले आहे की श्रेयस अय्यरची प्रकृती स्थिर आहे, तो फोन घेत आहे आणि आता तो स्वत:ची काळजी घेऊ शकत आहे.
बुधवारपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेपूर्वी सूर्यकुमार पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता, यावेळी त्याने श्रेयसच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले होते. त्याने सांगितले की 'तो जेवतही आहे, सिडनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही मदतीशिवाय चालू शकत आहे आणि फोनही घेत आहे.'
Shreyas Iyer: आता तर त्याला सोबतच घरी घेऊन जाऊ! सूर्यकुमार यादवने दिले श्रेयसच्या प्रकृतीचे अपडेट्स, मित्राची अवस्था पाहून...त्याने सांगितले की ज्यादिवशी दुखापत झाल्याचे कळाले, तेव्हा सूर्यकुमारने श्रेयसला फोन केला होता. पण तेव्हा त्याच्याकडे फोन नव्हता. त्यामुळे फिजिओ कमलेशला फोन केल्यानंतर श्रेयसची प्रकृती स्थिर असल्याचे कळाले.
तसेच त्याने सांगितले की गेल्या दोन दिवसापासून त्याचे श्रेयससोबत बोलणे झाले आहे. तो फोनवर उत्तरं देत आहे, म्हणजे तो आता स्थिर आहे. याशिवाय सूर्यकुमारने सांगितले की डॉक्टर तिथे असून तो बोलत आहे आणि आता सर्वकाही ठीक आहे.