भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांमधून नितीश कुमार रेड्डी बाहेर पडला आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, मांडीच्या दुखापतीतून सावरत असताना त्याला मानेमध्येही वेदना जाणवत आहेत.
बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर उपचार करत आहे.
बुधवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना कॅनबरा येथे खेळला जात आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे, याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे. भारताचा २२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमधून बाहेर झाला आहे.
AUS vs IND: पहिल्या T20I मध्येही ऑस्ट्रेलियानेच जिंकला टॉस, पण सूर्यकुमारच्या मनासारखा निर्णय घेतला; पाहा Playing XIटी२० मालिकेला यापूर्वीच हार्दिक पांड्या दुखापतीमुळे मुकला असल्याने नितीश कुमार रेड्डी या सामन्यात त्याच्या जागेवर खेळू शकतो, अशी शक्यता होती. मात्र आता तो या मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांना मुकणार आहे. बीसीसीआयने माहिती दिली आहे की तो मांडीच्या दुखापतीतून सावरत असतानाच त्याला मानेमध्येही वेदना जाणवत आहेत.
बीसीसीआयने याबाबत अपडेट दिले आहेत की 'नितीश कुमार रेड्डी पहिल्या टी२० सामन्यांमधून बाहेर झाला आहे. अष्टपैलू खेळाडू सध्या ऍडलेड वनडे सामन्यात झालेल्या डाव्या मांडीच्या दुखापतीतून सावरत होता, आता त्याला मानेमध्येही वेदना जाणवत आहे, ज्यामुळे त्याच्या रिकव्हरीवर परिणाम झाला आहे. सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर उपचार करत आहे.'
या टी२० मालिकेपूर्वी भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या मालिकेतून नितीशने वनडे पदार्पणही केले. मात्र ऍडलेडला दुसरा वनडे सामना खेळताना त्याच्या मांडीला दुखापत झाली. यामुळे त्याला तिसऱ्या वनडेत खेळता आले नव्हते. आता तो टी२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांनाही मुकणार आहे.
AUS vs IND, 1st T20I: टीम इंडियाचं ठरलंय... खेळपट्टी कशीही असू दे 'हे' तीन गोलंदाज खेळवणारचं! कर्णधार सूर्यकुमारने सांगितला प्लॅननितीशने आत्तापर्यंत ९ कसोटी, २ वनडे आणि ४ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ३८६ धावा, वनडेत २७ धावा आणि टी२०मध्ये ९० धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत त्याने कसोटीत ८ विकेट्स आणि टी२०मध्ये ३ विकेट्स घेतल्या आहेत.