मसाजच्या नावाखाली उलवेत वेश्याव्यवसाय
नवी मुंबई (वार्ताहर) ः उलवेतील मंत्रा स्पा सेंटरवर शनिवारी (ता. २५) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारला. या ठिकाणी वेश्याव्यसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. या कारवाईत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे सेक्टर २१ मधील अरमस कॉम्प्लेक्समध्ये मंत्रा स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी बनावट ग्राहक पाठवला होता. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला चार पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानुसार मालक हरीष माने, व्यवस्थापक अंजूषा तपासे (२८), प्रगती कादे (२३)विरोधात उलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.