तळेगाव दाभाडे, ता. २९ : नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विभागनिहाय मतदार याद्यांवर एकूण १,८९१ हरकती दाखल झाल्या आहेत. यापैकी ९२२ हरकतींसाठी पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रनिहाय तपासणी करून अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सनसाईक यांनी दिली.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती व आक्षेप नोंदविण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत होती. या काळात या हरकती प्राप्त झाल्या. प्रशासकीय पडताळणीनंतर पुरावे नसलेल्या हरकतींसाठी संबंधित भागात प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात एकूण १४ प्रभाग असून २८ नगरसेवक निवडले जाणार आहेत.
प्रभागनिहाय हरकतींचा तपशील
प्रभाग प्राप्त हरकती पुरावे नसलेल्या
१ ५७ - २९
२ १०४- ६४
३ १७९- १४५
४ ६६- ३४
५ ४५ - २२
६ २३० - ८०
७ २११- १५
८ ७७ - ३४
९ १२९ - ४५
१० ९३ - ५८
११ ३३४ - १५४
१२ २०२ - १५९
१३ ८० - ३३
१४. ८४ - ५o