सोलापूर: आंध्र प्रदेशातील वादळी वाऱ्यामुळे आजची गोवा ते सोलापूर व सोलापूर ते गोवा विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना पुढील विमानाचे तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
फ्लाय ९१ चे अधिकारी रणसुभे म्हणाले, आंध्रप्रदेशातील वादळी वाऱ्यामुळे विमानसेवेस अडचण असल्याने उड्डाण होणार नाही. हवामान विभागाच्या सूचनेनुसार ही सेवा रद्द करण्यात आली आहे. गोवा-सोलापूर विमानसेवा नियमित सुरू करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.
कंपनीच्या ताफ्यात आणखी एक नवीन विमान दाखल होणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा डिसेंबरपासून सोलापूर-गोवा विमानसेवा नियमित सुरू होणार असल्याची माहितीही रणसुभे यांनी दिली.