रांजणगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
हरवलेल्या तीन वर्षांच्या मुलाचा शोध घेऊन आईकडे सुपूर्त
सोशल मीडियाच्या मदतीने मुलाची ओळख पटली.
आई-मुलाच्या भावनिक पुनर्भेटीचा हळवा क्षण
सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी घडलेला एक प्रसंग हा भावनिक आणि हळव्या क्षणाचा ठरला. एका हरवलेल्या तीन वर्षांच्या मुलाला पोलिसांनी त्याच्या आईच्या स्वाधीन केल्यावर संपूर्ण पोलीस ठाण्यात भावनांचा पूर उसळला. पोलिसांच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू ओघळले.
या घटनेचा सुरुवात झाली दुपारच्या सुमारास. शिरुरमधील एक रिक्षाचालक सद्दाम अकबर खान यांना कारेगाव परिसरात हॉटेल पाटीलवाडा शेजारी एक तीन वर्षांचा मुलगा रस्त्याकडे भटकताना दिसला. त्याने विचारपूस केली, पण मुलगा काहीच बोलत नव्हता नाव नाही, गाव नाही, ओळख नाही. सद्दाम खान यांच्या मनात माया दाटली आणि त्यांनी तो मुलगा रिक्षेत बसवून थेट रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचा रस्ता धरला.
Samruddhi Expressway Bus Fire : समृद्धी महामार्गावर थरार! १२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट, नेमकं काय घडलं?पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तत्काळ परिस्थितीची गंभीर दखल घेतली. मुलाचे पालक शोधण्यासाठी दोन शोधपथके तयार करण्यात आली. कर्मचारी वैजनाथ नागरगोजे, आकाश सवाने, संदीप भांड, योगेश गुंड आणि महिला अंमलदार शितल रौंधळ व पुजा नाणेकर यांनी आसपासच्या गावांमध्ये शोधमोहीम सुरू केली.
YouTuber Attack : करण - अर्जुनची शहरात दहशत, सोशल मीडियावर बातमी व्हायरल केल्यानं युट्यूबरवर प्राणघातक हल्लायाचबरोबर पोलिसांनी सोशल मीडियाचाही आधार घेतला. मुलाचा व्हिडिओ तयार करून नागरिकांना आवाहन करण्यात आले. काही तासांतच तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि सायंकाळी कारेगाव येथील दिव्यभारती राम खिलारी या महिला पोलिस ठाण्यात धावत आल्या. चेहऱ्यावर चिंता आणि डोळ्यांत अश्रू… त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, 'हा माझा मुलगा मटरु आहे. सकाळपासून शोधतेय, पण सापडत नव्हता. आता सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला आणि धावत आले.' त्या माऊलीचे हे शब्द ऐकताच मटरूच्या आनंदाला पारावर उरला नाही.
Shocking News : महाराष्ट्र हादरला! साताऱ्यानंतर आता अमरावतीतही २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ?मुलाची ओळख पटताच पोलिसांनी तो आईच्या ताब्यात दिला. त्या क्षणी आईने आपल्या लेकराला मिठी मारली, आणि चिमुकल्यानेही तिच्या गळ्यात हात गुंफले. संपूर्ण पोलीस ठाण्यात शांतता पसरली फक्त आनंदाश्रू आणि उसासे ऐकू येत होते. महिला अंमलदार शितल रौंधळ आणि पुजा नाणेकर यांचेही डोळे पाणावले; त्यांनी या मुलाला दिवसभर आईसारखी काळजी दिली होती.
Maharashtra Cyclone Alert : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही तास धोक्याचे, वाचा IMD ने काय इशारा दिला?या घटनेनंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हरवलेल्या बालकाचा शोध घेऊन त्याला आईच्या कुशीत सुखरूप पोहोचवणाऱ्या या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की, पोलिसांची जबाबदारी फक्त कायद्याची नाही, तर मानवतेचीही आहे. ही घटना म्हणजे पोलिसांच्या संवेदनशीलतेचा आणि समाजातील त्यांच्या हृदयातील मायेचा जिवंत पुरावा असल्याचं सिद्ध झालं.