Nilesh Ghaiwal: गुंड निलेश घायवळ लंडनमध्येच, युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; अटकेसाठी हालचालींना वेग
Saam TV October 30, 2025 02:45 AM
Summary -
  • पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट

  • निलेश घायवळ लंडनमध्येच आहे

  • युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती

  • पुणे पोलिसांनी पाठवलेल्या पत्राला युके हाय कमिशनकडून उत्तर

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळ हा लंडनमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. युके हायकमिशनकडून पुणे पोलिसांना याबाबत उत्तर देण्यात आले आहे. ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा निलेश घायवळचा युकेमधील व्हिसा आहे. मुलगा लंडनमध्ये शिकत असल्याने निलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची माहिती युके हायकमिशनकडून पुणे पोलिसांना देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळ हा लंडनमध्येच आहे. युके हाय कमिशनने पुणे पोलिसांना उत्तर दिले आहे. युके हाय कमिशनने निलेश घायवळबाबत तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना कळवले असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे युकेमध्ये निलेश घायवळ कुठे लपून बसला आहे याची देखील माहिती लवकरच समोर येईल.

Nilesh Ghaywal Pune Land Mafia Exposed: घायवळ पुण्यातला लँड माफिया? पोलिसांच्या तपासात कारनामे उघड

निलेश घायवळला अटक करण्यासाठीपुणे पोलिसांनीजोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे पोलिसांनी युकेच्या हाय कमिशनला पत्र लिहून निलेश घायवळचा शोध घेऊन त्याला ताब्यात घ्या अशी मागणी केली. निलेश घायवळला अटक करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार सुरू आहे. पुणे पोलिसांनी पाठवलेल्या पत्राला युके हाय कमिशनने उत्तर दिले आहे. घायवळ लंडनमध्येच आहे. ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निलेश घायवळचा व्हिसा असल्याचे त्यांनी सांगितले.

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

निलेश घायवळ हा पुण्यातल्या कोथरूड परिसरातील गुंड आहे. निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी १७ ते १८ सप्टेंबर दरम्यान कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्यानंतर त्याच परिसरात एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार केले होते. या प्रकरणात निलेश घायवळसह त्याच्या टोळीविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल होताच निलेश घायवळ गायब झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करत निलेश घायवळ लंडनला पळून गेला. पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे.

Nilesh Ghaywal : कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात ट्विस्ट; मामाचा आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.