मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ असून तो मिटवल्याशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका घेवू नका या मागणीसाठी महाविकास आघाडी व मनसे पक्षाच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालायावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या परवानगीसाठी शिवसेना (ठाकरे), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यासह सहभागी पक्षाच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली.
मतचोरीविरोधात मनसेव महाविकास आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्त देवेन भारती व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर याविषयीच माहिती ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी दिली. मतदार याद्यांमधील घोळाबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने १ मार्च रोजी सत्याचा मोर्चा निघणार आहे.
BMC Election: भाजपचा मोठा गेमप्लॅन! स्थानिकच्या निवडणुकीत स्वबळावर लढवण्याच्या तयारीतया मोर्चाच्या नियोजनाबाबत व परवानगीसाठी मुंबई पोलीस आयुक्त तसेच अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीत सकारात्मक चर्चा झाली. मेट्रो सिनेमापासून मोर्चाला सुरुवात होईल आणि महापालिका मुख्यालयासमोर मोर्चा थांबेल. या ठिकाणी प्रमुख नेत्यांची भाषणे होतील, अशी माहिती खासदार सावंत यांनी दिली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल परब, काँग्रेस नेते सचिन सावंत आणि प्रकाश रेड्डी आदी नेते उपस्थित होते.
कामगारदेखील सामील होणारमोर्चाकरिता साधारणत: दुपारी एक वाजता लोक जमतील. दोन वाजण्याच्या दरम्यान मोर्चाला सुरुवात होईल. दोन अडीच तासांमध्ये मोर्चा संपेल. आम्ही चारच्या आतमध्ये मोर्चा संपविणार आहोत. आमच्या मोर्चामुळे मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. मोर्चात मोठ्या प्रमाणात कामगारदेखील सामील होतील. विरोधकांचे विविध पक्षातील नेते आणि कामगार वर्गदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी होईल, असे कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.
Mumbai News: शीव येथील बंद सायकल मार्गिकेवरील कचरा हटवा, उच्च न्यायालयाचे आदेश पक्षाचा मोर्चा नाही तर सत्याचा मोर्चाविधानसभा निवडणुकीत जे झाले त्याविषयी महाराष्ट्रातील लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष सहभागी होती. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसून सत्यासाठी आहे. या मोर्चात मतदार, लोक, कार्यकर्ते आणि नेते येणार आहेत. ज्यांचे मतदान चुकीच्या ठिकाणी गेले, ते मतदारही येणार आहेत. लोकांमधील ही अस्वस्थता बाहेर काढण्यासाठी लोक मोर्चात सहभागी होतील, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. मोर्चाला परवानगी मिळेल का या प्रश्वार मोर्चाला परवानगी जवळपास मिळाली असेच म्हणता येईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.