पुण्याची लेक Ferrari चालवून इतिहास घडवणार, बनणार पहिली भारतीय महिला
esakal October 31, 2025 11:45 AM

Diana Pundole to drive Ferrari 296 Challenge

डायना पंडोल

पुण्याची लेक असलेली रेसर डायना पंडोल ही मोठा इतिहास रचणार आहे.

Diana Pundole to drive Ferrari 296 Challenge

फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट स्पर्धा

नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ दरम्यान होणाऱ्या फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Diana Pundole to drive Ferrari 296 Challenge

पहिली भारतीय महिला ड्रायव्हर

त्यामुळे ती कोणत्याही आंतरराष्ट्रीय मोटारस्पोर्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत फेरारी चालवणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर ठरणार आहे.

Diana Pundole to drive Ferrari 296 Challenge

फॉर्म्युला वनच्या सर्किटवर स्पर्धा

ही स्पर्धा दुबई, अबू धाबी, कतार आणि सौदी अरेबिया येथील फॉर्म्युला वनच्या सर्किटवर होणार आहे.

Diana Pundole to drive Ferrari 296 Challenge

Ferrari 296 Challenge

३२ वर्षीय डायना या स्पर्धेत Ferrari 296 Challenge कार ताशी २५० किमी वेगाने चालवणार आहे.

Diana Pundole to drive Ferrari 296 Challenge

यापूर्वीही घडवलाय इतिहास...

दरम्यान, डायना भारताची प्रसिद्ध ड्रायव्हर असून तिने यापूर्वीच सलून प्रकारात इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशीप २०२४ स्पर्धा जिंकून इतिहास घडवला होता.

Diana Pundole to drive Ferrari 296 Challenge

रेसिंग चॅम्पियनशीपचे विजेतेपद

कार रेसिंग चॅम्पियनशीपचे विजेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ड्रायव्हर होती.

Diana Pundole to drive Ferrari 296 Challenge

ड्रायव्हिंगची आवड

डायनाला लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याचे दिसायचे, ती आई-बाबांसोबत स्टेरिंग हातात पकडायची. अहुरा रेसिंग टीमकडून तिची कार रेसच्या करियरची सुरुवात झाली.

Diana Pundole to drive Ferrari 296 Challenge

लग्न अन् दोन मुले

दरम्यान, २१ व्या वर्षी तिचे लग्न झाले, तिला दोन मुलेही आहेत. पण तिने तिचे कार रेसर बनण्याचे स्वप्न मागे सोडले नाही.

India and Australia cricketers wear black bands

World Cup Semifinal: भारत - ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दंडाला का बांधली काळी फित? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.