 
            ‘आयएफएलए एपीआर २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषद
मुंबई, ता. ३० ः भारत लवकरच जगातील सर्वात मोठ्या लँडस्केप आर्किटेक्चर परिषदेला यजमानपद निभावणार आहे. ‘आयएफएलए एपीआर २०२५ काँग्रेस आणि एक्स्पो’ ही आंतरराष्ट्रीय परिषद नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत होणार असून, तिची अधिकृत घोषणा १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पत्रकार परिषदेद्वारे केली जाणार आहे.
इंडियन सोसायटी ऑफ लँडस्केप आर्किटेक्ट्स (आयसोला) आणि आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ लँडस्केप आर्किटेक्ट्स (आयएफएलए) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली जात आहे. ही परिषद ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेशी सुसंगत असून, शाश्वत आणि हरित शहरे घडविण्यासाठी तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांना एकत्र आणणार आहे.