चारचाकीने श्वानाला चिरडले;
esakal October 31, 2025 02:45 PM

चारचाकीने श्वानाला चिरडले
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अंबरनाथ, ता. ३० (वार्ताहर) : शहरातील मिरा पार्क रॉयल सोसायटीजवळ एका भरधाव चारचाकीने रस्त्यावर झोपलेल्या श्वानाला चिरडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यानंतर संतप्त प्राणिमित्रांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अंबरनाथ (पूर्व), मिरा पार्क रॉयल सोसायटी गेटजवळ बुधवारी (ता. २९) रात्री पावणेनऊच्या सुमारास एमएच-०५ एफजी-२०५६ या क्रमांकाच्या कारने गेटजवळ झोपलेल्या श्वानाला चिरडले, ज्यात श्वानाचा जागीच मृत्यू झाला. कारचालक दिग्विजय बेरुलकर यांने मृत श्वानाला वाहनात टाकून तेथून पळ काढला. त्यानंतर प्राणिमित्र मनोज फलके यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे अंबरनाथमधील प्राणीमित्र आक्रमक झाले असून, आरोपी वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.