हे सगळं ज्याने कुणी केलं तो... शुभमन गिलसोबत लग्नाच्या चर्चांवर मराठी अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली, 'एक क्रिकेटर...
esakal October 31, 2025 02:45 PM

लोकप्रिय क्रिकेटपटू शुभमन गिल याच्या खेळासोबतच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आजवर त्याचं नाव अनेक मुलींसोबत जोडलं गेलं. सारा अली खान ते अवनीत कौर यांसोबतच त्याच्या नात्याच्या जोरदार चर्चा झाल्या. त्यातही त्याचं आणि सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर हिचं देखील अफेअर असल्याचं बोललं गेलं. मात्र यांसोबत आणखी एक अभिनेत्री होती जिच्यासोबतच शुभमनचं नाव जोडलं गेलेलं. ती अभिनेत्री म्हणजे रिधिमा पंडित. आता रिधिमाने त्यांच्या नात्याबद्दल मौन सोडलं आहे.

रिधिमा आणि शुभमन एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत असं देखील म्हटलं गेलं. आता रिधिमाने या चर्चा खोट्या होत्या असं सांगितलंय. रिधिमाने नुकतीच हिंदी रशला मुलक्जत दिली. यात बोलताना ती म्हणाली, 'एक क्रिकेटर आहे ज्याला मी ओळखतही नाही. तसंच आजवर कधी भेटले सुद्धा नाही. पण, आमच्याबद्दल प्रचंड अफवा पसरवल्या गेल्या. काही लोकांचं असंही म्हणणं होतं की, या अफवा आम्ही प्रसिद्धीसाठी पसरवल्या. पण, मला याची कधी गरजच वाटली नाही. हे सगळं कुठून येतं मला माहित नाही.'

View this post on Instagram

A post shared by Ridhima Pandit (@ridhimapandit)

ती पुढे म्हणाली, ''मी खरं सांगते, आम्ही कधीच भेटलो नाही. एका पार्टीमध्येच मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. मात्र, तो एकटाच तिथे नव्हता तर, बरेच सेलिब्रिटी सुद्धा त्या ठिकाणी होते. या अफवा अशा पसरवल्या गेल्या की हे सगळं मीच केलं आहे. या गोष्टींमुळे मी खूप डिस्टर्ब झाले. मला हेच कळत नव्हतं की, लोकांना कसं सांगू? त्या व्यक्तीचा आमच्या इंडस्ट्रीसोबत कोणताही संबंध नाही. आम्ही कधी भेटलोही नाही. मग अशा अफवा कशा पसवल्या गेल्या. या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या घरच्यांना देखील खूप त्रास झाला. कारण, लोकांना नेहमी क्रिकेटर्स योग्य आणि कलाकार चुकीचे वाटतात.'

रिधिमा 'बहु हमारी रजनीकांत' या मालिकेतून घराघरांत पोहोचली. सोबतच ती 'खतरो के खिलाडी' या शोमध्येही दिसली. नुकताच तिचा 'प्रेमाची गोष्ट २' हा चित्रपट प्रदर्शित झालाय. यात ती ललित प्रभाकरसोबत झळकतेय.

आम्हाला बाळ नकोय! १२ वर्षांच्या संसारानंतर लोकप्रिय मराठी कपलचा मोठा निर्णय; एक नाही सांगितली २ कारणं
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.