ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20i मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी 30 ऑक्टोरबरला दुसर्या टी 20i सामन्यात टीम इंडियावर मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला मालिका जिंकायची असेल तर कोणत्याही स्थितीत तिसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. मालिका विजयाच्या दृष्टीने भारताला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागेल. तसेच हा सामना गमावला तर भारताला मालिका जिंकता येणार नाही. तसेच त्यानंतर भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाला मालिका विजयापासून रोखावं लागेल. त्यामुळे तिसरा सामना भारतासाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे.
टीम इंडियासमोर अनेक आव्हानंतसेच टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर एकदाही टी 20i मालिका गमावलेली नाही. भारताने तेव्हापासून खेळलेल्या पाचही टी 20i मालिका जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे भारताने ऑस्ट्रेलियात एकदाही टी 20i मालिका गमावलेली नाही. त्यामुळे आता ही कामगिरी कायम ठेवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यातील पराभवांनतर तिसर्या मॅचमध्ये कमबॅक करावं लागणार आहे. त्यामुळे सूर्यासेनाच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. उभयसंघातील तिसरा टी 20i सामना कधी आणि कुठे होणार? याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20i सामना केव्हा?ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20i सामना रविवारी 2 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20i सामना कुठे?ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20i सामना होबार्टमधील बेलेरिव ओवल येथे होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजून 15 मिनिटांनी टॉसविजेता निश्चित होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.