दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कसोटी आणि टी 20i मालिका खेळवण्यात आली. दक्षिण आफ्रिकेने दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत पराभूत करत मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने कसोटीप्रमाणे टी 20i मालिकेतही विजयी सलामी दिली. मात्र पाकिस्तानने त्यानंतर सलग 2 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. पाकिस्ताने दक्षिण आफ्रिकेवर 2-1 ने विजय मिळवला. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.