CNG भरताना कारमधून खाली का उतरावे लागते? सेफ्टीसह ही कारणेही आहेत महत्त्वाची
GH News November 05, 2025 09:37 PM

भारतात गेल्या काही काळापासून सीएनजी कारची संख्या वाढलेली आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सीएनजीवर चालणाऱ्या कार या पेट्रोल आणि डिझेलपेक्षा जास्त मायलेज देतात. तसेच सीएनजीची किंमत पेट्रोल आणि डिझेलपेक्षा कमी असते, त्यामुळे अनेकांना सीएनजी कार परवडते. मात्र ही कार वापरणाऱ्यांसाठी एक अडचण म्हणजे या कारमध्ये सीएनजी भरताना कारमधील सर्वाना गाडीच्या खाली उतरावे लागते. त्यानंतर कारमध्ये सीएनजी भरला जातो. या मागे सुरक्षितता हे एक सर्वांना माहिती असणारे कारण आहे. याव्यतिरिक्त कोणते कारण आहे ते जाणून घेऊयात.

सीएनजी भरताना कारमधील खाली का उतरावे लागते याची कारणे खालील प्रमाणे

  • सीएनजी 200 ते 250 पीएसआय (प्रति चौरस इंच पौंड) च्या उच्च दाबाने भरले जाते. यामुळे थोडीशी गळती झाली तरी मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे गाडीतून खाली उतरवले जाते.
  • सीएनजी भरताना गॅसची गळती झाल्यास गाडीतील प्रवाशांना धोका निर्माण होतो, मात्र बाहेर असलेल्यांना हा धोका कमी असतो, त्यामुळे प्रवाशांना गाडीच्या खाली उतरवले जाते.
  • कारच्या आत घर्षणामुळे Static Electricity निर्माण होऊ शकते, त्यामुळे गॅस गळती झाल्यास या विजेच्या लहान ठिणगीमुळे आग लागू शकते.
  • सीएनजीच्या वासामुळे अनेकांना डोकेदुखी, चक्कर येणे किंवा उलट्या होण्याचा त्रास होतो, मात्र कारच्या बाहेर असल्यास या समस्या टाळता येतात.
  • सीएनजी भारताता टाकीत मर्यादेपेक्षा जास्त गॅस भरला जाऊ नये यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. जास्त गॅस भरल्यास दाब वाढू शकतो आणि अपघात होऊ शकतो. त्यामुळे बाहेर राहणे फायदेशीर ठरते.
  • सीएनजी किट जर बाहेरील मेकॅनिकने बसनले असेल आणि सीएनजी भरणाऱ्याला किटच्या फिटिंग किंवा गळतीची माहिती नसेल तर अपघात होऊ शकतो, त्यामुळे गाडीबाहेर असणे कधीही फायदेशीर ठरते.

सीएनजी कार बाजारात कधीपासून आल्या?

मारुती सुझुकीने सर्वप्रथम फॅक्टरी-फिटेड सीएनजी कार लाँच केली होती. कंपनीने 2010 मध्ये अल्टो, वॅगनआर आणि इको सारख्या कारमध्ये सीएनजी किट देण्यास देण्यास सुरुवात केली होती. तोपर्यंत कोणत्याही कंपनीने फॅक्टरी-फिटेड सीएनजी कार विकल्या नव्हत्या. कार खरेदी केल्यानंतर लोकांना बाजारात किट बसवावे लागत होते. मात्र आता जवळपास प्रत्येक कंपनी सीएनजी कार विकते. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.