ऐन निवडणुकीत भाजपाला सर्वात मोठा धक्का, नेत्याने थेट राजीनामा पाठवला, राजकारणात उलथापालथ!
GH News November 05, 2025 09:37 PM

Rajesh Sawant Resignation : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात स्थानिक पातळीवरील राजकाणात घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाड्यांसाठी स्थानिक पातळीवर शक्यता पडताळून पाहिली जात आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर दुसरीकडे राजीनामे आणि पक्षांतराची मोठी लाट आली आहे. जवळपास सर्वच पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामा देऊन सोईच्या पक्षात प्रवेश केला आहे. असे असतानाच आता भाजपाला कोकणात सर्वात मोठा धक्का बसला आहे. तेथे एका नेत्याने भाजपाची साथ सोडली आहे. परिणामी कोकणात भाजपाला मोठा धक्का बसणार आहे.

कोणत्या नेत्याने राजीनामा दिला?

कोकणात पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी भाजपाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून कोकणात आपलेच वर्चस्व आहे, हे भाजपाला दाखवून द्यायचे आहे. असे असतानाच आता भाजपाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे.

दक्षिण रत्नागिरीची होती जबाबदारी

राजेंद्र चव्हाण कोकणातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. भाजपा पक्षाने त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. विशेषत: त्यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याचे नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र ऐन

रवींद्र चव्हाण यांची बैठकही रद्द

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे राजेश सावंत यांच्या राजीनाम्याची माहिती मिळताच रवींद्र चव्हाण यांची रत्नागिरी शहरात होणारी कार्यकर्ता बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.