गाडी धुताना 8 वर्ष लहान गर्लफ्रेंंडसोबत रोमॅंटिक झाला हार्दिक पंड्या, व्हिडीओ व्हायरल, गालावर…
Tv9 Marathi November 05, 2025 09:45 PM

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. नताशा हिच्यासोबतच्या घस्फोटानंतर पुन्हा एकदा हार्दिक प्रेमात पडला. नताशा आणि हार्दिक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आम्ही विभक्त होत असल्याचे जाहीर केले. नताशा आणि हार्दिक पंंड्याला एक मुलगा असून दोघे मिळून त्याचा सांभाळ करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवस डेट केल्यानंतर हार्दिक पंड्याने अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविकसोबत लग्न केले आणि लग्नाच्या काही वर्षातच घटस्फोट घेतला. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक मॉडेल माहिका शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे मालदीवला जाताना स्पॉट झाली.

हार्दिक पंड्याने आपला वाढदिवस माहिका शर्मा हिच्यासोबत मालदीवमध्ये  साजरा केला. या वाढदिवसाचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. हार्दिक पंड्या सतत माहिका शर्मा हिच्यासोबत स्पॉट होताना दिसतोय. हार्दिक पांड्याने नुकताच त्याची गर्लफ्रेंड महिकासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दोघांचे एकमेकांवरील प्रेम स्पष्ट होताना दिसंतय.

हार्दिक पंड्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये दोघे एकत्र मिळून गाडी धुताना दिसत आहेत. हार्दिक साबण लावून कापडाने गाडी स्वच्छ करत आहे तर महिका पाईपाने पाणी टाकतंय. यादरम्यान माहिका हार्दिकच्या गालावर अतिशय प्रेमाने किस घेते. दोघेजण गाडी धुताना रोमॅंटिक होताना दिसत आहेत. अनेकांना माहिका आणि हार्दिक पंड्या यांचा व्हिडीओ आवडत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93)

काही फोटोंमध्ये हार्दिक आणि माहिका एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. यादरम्यान आठवणीने हार्दिक पंड्या याने मुलगा अगस्त्य याचेही फोटो शेअर केले. गर्लफ्रेंड माहिका हिच्यासोबत असताना देखील हार्दिक पंड्याला मुलाची आठवण येत असल्याचे फोटोवरून दिसत आहे. हार्दिक पंड्याने यंदाची दिवाळी त्याच्या दोन आवडत्या व्यक्तींसोबत साजरी केली. मुलगा अगस्त्य आणि गर्लफ्रेंड माहिका यांच्यासोबत दिवाळी साजरी करताना हार्दिक पंड्या दिसला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.