सध्या इलेक्ट्रीक कारची क्रेझ प्रचंड वाढली आहे. परंतू इलेक्ट्रीक कारचे चार्जिंग स्टेशनची संख्या पुरेशी नसल्याने इलेक्ट्रीक कार घेताना ग्राहक विचार करत आहेत. परंतू आता इलेक्ट्रीक कारना धावतानाच चार्जिंग करणारा हायवे तयार करण्यात यश आले आहे. त्यामुळे कार आपोआप चार्ज होणार आहे.
इलेक्ट्रीक कारना धावतानाच चार्ज करणारा हायवे तयार करण्यात यश आले आहे आहे. फ्रान्सने जगातला पहिला चार्जिंग हायवे तयार केला आहे. जो वाहना धावत असतानाचा त्यांना वायरलेस पद्धतीने चार्ज करु शकणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे रस्ते स्वत:च ऊर्जेचा स्रोत बनणार आहेत. आणि कार चावतानाच आपोआप चार्जिंग होणार आहे.
फ्रान्स जगातला पहिला असा हायवे लाँच केला आहे. जो डायनामिक वायरलेस चार्जिंग सिस्टीमने लेस असणार आहे. या तंत्राने इलेक्ट्रीक वाहन चालवताना त्याला चार्जिंग करता येणार आहे.त्यामुळे वाहनांना आता चार्जिंग स्टेशनला थांबण्याची काहीही गरज राहणार नाही.
हा प्रयोग पॅरीसपासून सुमारे ४० किलोमीटर दक्षिण-पश्चिम स्थित A10 हायवेवर सुरु करण्यात आला आहे. अनेक संघटनांनी मिळून या योजनेला विकसित केले आहे. याचे नाव ‘चार्ज ऐज यु ड्राईव्ह’ असे आहे. फ्रान्समध्ये A10 हा हायवे १.५ किलोमीटर लांबीचा असून यात रस्त्याच्या आत कॉईल लावण्यात आल्या आहेत. या कॉईलवरुन कार इलेक्ट्रीक कार जात असताना चार्जिंग होणार आहे. चाचणीत हा प्रयोग यशस्वी झाला आहे. याची कमाल शक्ती ३०० किलोवॅट हून अधिक आहे. आणि सरासरी ऊर्जा हस्तांतर क्षमता २०० किलोवॅट इतकी आढळली आहे.
जेव्हा कोणतेही वाहन रस्त्याच्या खाली लावलेल्या विद्युत चुंबकीय कॉईलवरुन जाईल तेव्हा चुंबकीय क्षेत्राच्या माध्यमातून वीज वाहनावर लागलेल्या रिसिव्हरच्यापर्यंत पोहचेल. याचा मोठा फायदा हा आहे की वाहनांना चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशनवर उभे ठेवण्याची काहीही गरज नाही.रस्त्याच्या खाली लावलेले ट्रान्समिट कॉईल आणि रिसीव्हर कॉईल दरम्यान वीजेचे अदान-प्रदानाला सेंसर आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वास्तविक काळात नियंत्रण केले जाऊ शकते.