ब्लॅक कॉफी कॅफिनचा प्रमुख स्त्रोत आहे. अनेक जणांची सकाळ ब्लॅक कॉफीशिवाय होत नाही. ब्लॅक कॉफी दिवसातून एकदा प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मूड सुधारण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत ही कॉफी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे ब्लॅक कॉफी केवळ एक पेय नसून निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे (Black coffee Health Benefits).
वजन कमी करणे –
ब्लॅक कॉफी मेटाबॉलिझम वाढवते आणि फॅट्स कमी करण्यास मदत करते. कॅफीनमुळे शरीराची उष्णता निर्माण होण्याची प्रक्रिया सक्रिय होते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी जाळण्याची प्रक्रिया जलद होते.
मूड सुधारण्यासाठी उपयुक्त –
ब्लॅक कॉफी मूड सुधारण्यासाठी फायदेशीर असते. कॅफीन मेंदूमधील डोपामाईनचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे सकारात्मकता येते आणि डिप्रेशन दूर होते. त्यामुळे सकाळी तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता.
हेही वाचा – चटकदार पाणीपुरी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा अनोखे फायदे
मेंदूचे कार्य सुधारते –
काही अभ्यासानुसार ब्लॅक कॉफी नियमितपणे घेतल्यास स्मरणशक्ती सुधारते. तसेच यातील ऍटी-ऑक्सिडंट्स आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
हे महत्त्वाचे –
ब्लॅक कॉफी वजन कमी करणे, मूड सुधारणे, चांगली स्मरणशक्ती राखणे यासाठी एक उत्तम पर्याय आहे. मात्र, याचा अतिरेक टाळावा. योग्य प्रमाणात सेवन केल्यास ब्लॅक कॉफी तुम्हाला निरोगी जीवनशैली नक्कीच मिळवून देईल.
कशी बनवाल?
साहित्य –
कृती –
हेही वाचा – Baby Ear Piercing: बाळाचे कान कधी टोचावे? ते करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं